आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता
7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी अशी माहिती दिली आहे की, महागाई आटोक्यात येत असल्यानं आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन आर्थिक वर्षात भारतीय केंद्रीय रिझर्व्ह बँकेने जनतेला मोठा दिलासा दिला. हे नवीन आर्थिक वर्ष जनतेसाठी गुडन्यूज घेऊन आले. रेपो दरात कुठलीही वाढ झाली नाही. सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला.